Share

‘महाराष्ट्र देशा’ने प्रतिभावान कलावंतांचीही दखल घ्यावी – श्रीकांत उमरीकर

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्रातील आघाडीचे वेब पोर्टल ‘महाराष्ट्र देशा’च्या औरंगाबाद कार्यालयाचा शानदार उद्घाटन सोहळा प्रजासत्ताक दिनी पार पडला. या सोहळ्यात शहरातील नामवंत प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनी हजेरी लावली. यावेळी इतर माध्यमांकडून दुर्लक्षित जाणाऱ्या मूलभूत समस्यांची दखल महाराष्ट्र देशाने घ्यावी अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. महाराष्ट्र देशा हे राज्यातील अग्रगण्य डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. पुणे येथे महाराष्ट्र देशा न्यूज पोर्टलचे मुख्य कार्यालय आहे. सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असलेल्या आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या औरंगाबाद शहरात महाराष्ट्र देशाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

औरंगाबादेतील प्रसिद्ध साहित्यिक व समाजसेवक श्रीकांत उमरीकर म्हणाले की, मराठवाड्यातील लोककलावंत, येथील मूलभूत समस्यांकडे माध्यमांचे फारसे लक्ष जात नाही. इतिहासाचा मोठा वारसा मराठवाड्याला लाभलेला आहे. तो जतन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. अनेक तरुण नवोपक्रम राबवत आहेत, परंतु त्यांची दखल घेतली जात नाही. महाराष्ट्र देशाच्या माध्यमातून ती निश्चितपणे घेतली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे विषय, ग्रामीण भागातले विषय, सांस्कृतिक, कलात्मक विषय यांच्याकडे प्रस्थापित माध्यमांचे बऱ्याचदा दुर्लक्ष होते, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

https://www.facebook.com/MHDaurangabad/videos/419948632451550

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जीएसटीचे अतिरिक्त आयुक्त सुनील देशमुख (आयआरएस) यांची उपस्थिती होती. तर जीएसटीचे उपायुक्त अजित तोगरे (आयआरएस), माजी सनदी अधिकारी विजयकुमार तोगरे, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता पाठक, नगरसेविका माधुरी अदवंत, एंजल किड्स स्कूलचे संस्थापक तुकाराम मुंढे, ज्येष्ठ साहित्यिक तथा समाजसेवक श्रीकांत उमरीकर, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे, प्रा. निमा शिंदे, भाजप पदाधिकारी मनीषा भन्साली यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्र देशाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत संचालक मनोज जाधव, अभिजीत दराडे व संपादक नीलेश जोशी यांना शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!