मुंबई : करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक हातावर पोट असणाऱ्या लोकांवर मोठ संकट ओढावले होत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेकांनी गरजूंना मदत करण्याचे कार्य केले. अशीच मदतीचा हात अभिनेता सोनू सूदने पुढे केला.
शेकडो मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं, अनेकांना रोजगार मिळवून दिला. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. सोनूने केवळ गरीबांनाच नव्हे तर काही सेलिब्रिटींना देखील मदत केली आहे. यापैकी एक सेलिब्रिटी म्हणजे अमित साध. ‘सुलतान’, ‘काय पो छे’, ‘रेस ३’ यांसारख्या अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकलेल्या अमितला सोनू सूदमुळे पहिला ब्रेक मिळाला होता.
“सोनू मुळेच मला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. आज मी जे काही यश मिळवलं त्याचं श्रेय मी सोनूला देतो. आज त्याच्या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होत आहे. परंतु खरं सांगायचं झालं तर तो गेली कित्येक वर्ष लोकांची मदत करतोय.” अशा आशयाचं ट्विट करुन अमितने सोनू सूदचे आभार मानले. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
दरम्यान सोनूच्या या कामगिरीवर पुस्तक देखील आले आहे, ज्याला ‘आय एम नो मशीहा’ असे म्हणतात. सोनूने आपल्या ट्विटर पृष्ठावरील एका व्हिडिओच्या माध्यमातून या पुस्तकाची माहिती शेअर केली आहे.
https://twitter.com/TheAmitSadh/status/1343252175603048453?s=20
महत्वाच्या बातम्या
- ‘भारतात राहुल गांधी यांची सुटी संपली आहे आणि ते आज इटलीला परत गेलेत’
- … अखेर राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याचे खरे कारण आले समोर
- महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही; ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित : आदित्य ठाकरे
- देशातील पहिल्या ‘चालकरहीत’ मेट्रोचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
- काँग्रेसच्या आमदारांनी घेतली अमित शाह यांची भेट; दोन आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

