मुंबई : मागील महिन्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यानंतर २९ मे रोजी झालेल्या बैठकीत आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरित सामने हे आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येईल अशी घोषणा बीसीसीआयने केली. नविन वेळापत्रकानुसार अनेक विदेशी खेळाडू स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती.
आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरित हंगामात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशचे खेळाडू खेळु शकणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण त्या काळात त्या संघाचे आंतरराष्ट्रीय वेळापत्रक व्यस्त आहे. यावर आता इंग्लंडचा दिग्गज खेळाडु आणि आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य असलेला जोस बटलरने शिक्काबोर्तब केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला की,’आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर एकाच वेळी होत असतील तर मी राष्ट्रीय संघाकडुन खेळण्याचा निर्णय घेईन. तसेच आयपीएल स्पर्धेत इंग्लंडच्या खेळाडूंनी खेळावं की नाही याचा निर्णय इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे संचालक एश्ले जाईल्स यांनी घ्यावा’ असेही बटलर यावेळी म्हणाला.
एश्ले जाईल्स यांनी यापुर्वीच स्पष्ट केले होते की आयपीएल २०२१च्या उर्वरीत हंगामात इंग्लंडचे खेळाडू सहभागी होणार नाही. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि ऍशेज मालिकेसाठी त्यांचे फिट राहणे अवश्यक आहे. मात्र बटलरने आयपीएल मधून माघार घेतल्याने राजस्थान रॉयल्स संघाच्या अडचणीत वाढ होत आहे. आयपीएल स्पर्धा स्थगितीपुर्वी अखेरच्या सामन्यात बटरलने शतक झळकावले होते.
महत्वाच्या बातम्या
- बीड पोलिसांचे काम होणार वेगवान! दलात १६५ वाहनांचा समावेश
- अनिल परबांना दिलासा ; नाशिक पोलिसांनी केला ‘हा’ मोठा खुलासा
- …यामुळे पुजारासाठी इंग्लंड दौरा असु शकतो अखेरची संधी
- इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला मोठा धक्का, ‘या’ खेळाडूने दिला राजिनामा
- आयसीसीच्या त्या नियमावर गावसकरांनी दर्शवली नाराजी, म्हणाले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

