Share

अनिल परबांना दिलासा ; नाशिक पोलिसांनी केला ‘हा’ मोठा खुलासा

Published On: 

मुंबई : निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारिनंतर पोलिसांनी कथित आरटीओ भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरु केली होती. या चौकशीत पोलिसांना भ्रष्टाचार झाल्याचं आढळलं नाही. त्यामुळे वरिष्ट अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांनाही क्लिन चीट देण्यात आली आहे.

यामुळे आता परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आरटीओमधील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी नाशिकमध्ये कोणताच गुन्हा घडला नसल्याचं पोलीस चौकशीतून निष्पन्न झालं आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी 15 मे 2021 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्यामध्ये त्यांनी आरटीओ विभागातील बदल्या, अधिकाऱ्यांच्या कामकाजातील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार या संदर्भात तक्रार केली होती. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते.

परंतु, त्यांची तक्रार ही केवळ नाशिकपुरतीच मर्यादित नसून ही संपूर्ण राज्यातील आरटीओच्या इतर विभागांमध्येही अशाच स्वरुपाचे गैरव्यवहार झालेत, अशी त्यांची तक्रार होती. नाशिकमध्ये असा गुन्हा घडला नाही, परंतु, राज्यांतील इतर आरटीओ विभागांत काय घडलं आहे? याचा संपूर्ण अहवाल नाशिक पोलिसांनी पोलीस महासंचालकांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे नाशकात क्लिन चीट मिळाली असली तरी राज्यांतील इतर विभागांत काय घडलंय हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!