Share

बीड पोलिसांचे काम होणार वेगवान! दलात १६५ वाहनांचा समावेश

Published On: 

बीड: जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात आता १५१ दुचाकी, आठ जीप, डायल ११२ पथकासाठी दोन जीप तसेच दोन टियूव्ही असे एकूण १६५ वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी या वाहनांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम जिल्हा पोलिस कवायत मैदान येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती व त्यांच्याच हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पोलिस अधीक्षक आर. राजा व इतर मान्यवरांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅंकर विशाखा रूपल यांनी केले.

यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी संवाद साधला, पोलिस दलास सक्षम करण्यासाठी आवश्यक ते संसाधने व उपकरणे उपलब्ध करून देऊ. पोलिस दलाने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा तसेच सर्वसामान्य लोकांना कायद्याचे राज्य आहे, अशी भावना निर्माण व्हावी असे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन पालकमंत्री मुंडे यांनी केले. पोलिस दलाच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा नियोजन समितीमधून १५१ दुचाकी, आठ जीप, डायल ११२ पथकासाठी दोन जीप तसेच दोन टियूव्ही असे एकूण १६५ वाहनांचा समावेश आता पोलिस दलात झाला आहे. जिल्ह्यात प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत एक महिला बीट अंमलदार असेल. याशिवाय सहा पिंक मोबाईल पथके महिला सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आली आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. राजा यांनी केले तर आभार अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी मानले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!