Share

भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडावा, राऊतांचा सल्ला

Published On: 

नाशिक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या आमदारकीमुळे नांदगाव महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे छगन भुजबळांनी नांदगावच्या जागेचा नाद सोडवा, असा सल्ला रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा कांदेंच्या पाठीवर थाप मारली. शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते संजय राऊत सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राऊत रविवारी नांदगाव मतदार संघात होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार सुहास कांदे यांनी राऊत यांच्यासमोर आपले दुःख मांडले.

राऊत साहेब आपणच वाली आहात. आम्ही आमचं दुःखं कोणाकडे मांडायचं (असं म्हणत छगन भुजबळ यांना टोला हाणला). मी भुजबळ यांच्या मुलाला पाडलं म्हणून बोलत नाही. ते मला सावत्र मुलासारखं करतात. आम्ही कोणाकडे जाणार. तुमच्याकडेच मागणार आणि आता निधी दिला नाही तर अख्खी DPDC घेऊन येणार असा इशाराही दिला.

सुहास कांदे यांनी अत्यंत तळमळीने विषय मांडले. एखाद्या आमदाराला आपल्या मतदार संघाबद्दल किती आत्मियता असावी. सुहास कांदे पाहुणचार चांगला करतात. एकदा भुजबळ यांना पाहुणचारला बोलवा, करून तर पाहू. आता भगवा खाली येणार नाही. आपण भुजबळ यांना सांगू नांदगावचा नाद सोडायला सांगू. आज नाशिकला लाल दिवा आहे. उद्या नांदगावला मिळेल. महाविकास आघाडी सरकार झालं नसतं, तर ते मंत्री झाले असते का, आमच्यावरती आणि नांदगाववरती अन्याय करायला असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!