Share

स्वयंपाक चांगला येत नसल्याने महिलेला घराबाहेर काढले

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : विवाहीतेला चांगला स्वयंपाक येत नसल्याने तिचा छळ करुन तिला घराबाहेर हाकलुन दिल्यामुळे सासरच्या मंडळीच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. धर्माबाद तालुक्यातील संगम येथे ही घटना घडली. विवाहीतेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीच्या विरोधात बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहेरहून दोन लाख घेऊन ये अशी सासरच्या मंडळीनी विवाहीतेकडे मागणी केली होती. ही मागणी पुर्ण करण्यासाठी विवाहीतेला सासरची मंडळी नेहमी त्रास द्यायची. तर दुसऱ्या घटनेत माहेरहुन पतीला नोकरीला लावण्यासाठी दहा लाख रुपये घेउन ये अशी मागणी करुन तिला त्रास दिला. विवाहीतेच्या सासरच्या मंडळीनी प्लॅट घेण्यासाठी माहेरहुन दहा लाख रुपये घेऊन यावे या मागणीसाठी तिचा छळ करत उपाशीपोटी ठेवण्यात आले.

देगलुर तालुक्यातील वझरगा येथे ही घटना घडली. पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लॉकडाउच्या काळापासुन कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर येत आहे. या त्रासामुळे अनेक महिला पुढे येऊन तक्रारही नोंदवत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!