Share

बिस्किटच्या डिझाईनच्या कॉपी प्रकरणी ओरियो पार्लेविरुद्ध न्यायालयात

Published On: 

नवी दिल्ली: आपण नेहमी बिस्किट्सच्या जाहिराती नवनवीन बिस्किट उत्पादन वापरत असतो. यामध्ये पार्ले हि अत्यंत जुनी आणि नामांकित कंपनी आहे. ‘हाऊस ऑफ पार्ले’ या स्वरुपात सुरुवात 1928 साली करण्यात आली होती. याचे मालक मोहन दयाल चौहान यांनी 18 व्या वर्षी गारमेन्ट व्यवसायाच्या स्वरुपात या व्यवसायाची सुरुवात केली आहे. त्यानंतच्या काळात आपल्या व्यावसायिक कौशल्याने त्यांनी पार्लेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आज देशभरात पार्लेच्या 130 पेक्षा जास्त फॅक्टरी आहेत आणि जवळपास 50 लाख रिटेलर्स आहेत. प्रत्येक महिन्यात पार्ले जी जवळपास एक अब्जपेक्षा जास्त पॅकेटचे उत्पादन करते.

मात्र आता याच पार्ले विरुद्ध ओरियो बिस्किट कंपनीने बिस्किटच्या डिझाईन कॉपी केल्या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका पॅकेजिंग आणि बिस्किटच्या डिझाईनच्या कॉपी संबंधी आहे. पार्लेच्या फॅबियो बिस्किटचे डिझाईन हे ओरियोच्या बिस्किटप्रमाणे असल्याचा आरोप करत ओरियोने या विरोधात याचिका दाखल केली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेवर 12 एप्रिलला सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. अमेरिकेतील मोंडलीज इंटरनॅशनलच्या इंटरकॉन्टिनेन्टल ग्रेट ब्रान्ड्स ने ट्रेडमार्कच्या उल्लंघनाशी संबंधित याचिका दाखल केली आहे. 9 फेब्रुवारी रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असून त्यावेळी उच्च न्यायालयाने ओरियोच्या वकिलांनी या प्रकरणी लवकर सुनावणी घ्यावी ही मागणी फेटाळली आहे.

मोंडलीजने भारतात 10 वर्षापूर्वी ओरियो बिस्किट लॉन्च केलं होतं. तर पार्ले कंपनीने गेल्यावर्षी जानेवारीमध्ये आपले फॅबिया प्रोडक्ट लॉन्च केलं होतं. ओरियोने आतापर्यंत या ब्रॅन्डचे अनेक व्हेरियन्ट लॉन्च केले आहेत. यामध्ये चोको क्रीम, ओरियो व्हॅनिला ऑरेंज, स्ट्रॉबेरी यांचा समावेश होतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!