मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. तिसऱ्या दिवशी भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.
विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं झालेल्या नुकसान भरपाईचा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांना मदत आणि नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याविषयी विधानसभा अध्यक्षांनी निर्देश घेण्याचे आवाहन केले. त्यावर अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सरकार काळजी घेईल, असं म्हटलं. त्यावर सरकार काळजीवाहूचं आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
तत्पूर्वी, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप आमदार यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- सिट्रोन C5 एयरक्रॉस डोमेस्टिक मार्केटमध्ये धडकणार ! लाँचिंगपूर्वी बुकिंग सुरु…
- आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही, सभागृहात मुनगंटीवार आक्रमक
- वेतन थकल्याने अब्दुल सत्तारांच्या विरोधात ‘शोले स्टाईल’ आंदोलन
- बिस्किटच्या डिझाईनच्या कॉपी प्रकरणी ओरियो पार्लेविरुद्ध न्यायालयात
- महाविकास आघाडीतुन काँग्रेस सर्वप्रथम बाहेर पडेल : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

