मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. तिसऱ्या दिवशी भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.
जळगाव येथील एका वसतिगृहात काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज विधानसभेत त्यावरून पडसाद उमटले. आमदार श्वेता महाले यांनी जळगावच्या आशादीप वसतिगृहाचा हा विषय काढला. पोलीस महिलांचे रक्षक आहेत. पण तेच महिलांवर अन्याय करत आहेत. महिलांना नग्न करून नाचवले जात आहे हे गंभीर आहे, असं महाले म्हणाल्या.
तर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या प्रकरणावरून कमालीचे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणावरून मुनगंटीवारांनी प्रचंड संताप व्यक्त करत थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचं सांगितल. मी संविधानाला मानणारा आहे. संविधानाचं पालन करणारा आहे. पण राज्यात आमच्या आयाबहिणींची होत असलेली थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या आयाबहिणीला नग्न केलं जातं हे महाराष्ट्राला शोभते काय? असा सवाल करतानाच सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. तशी मलाच मागणी करावी लागेल, असं ते म्हणाले.
तर, मुनगंटीवारांनी राष्ट्रपती राजवटीच्या मागणीचा इशारा देताच नवाब मलिक यांनी त्याला जोरदार हरकत घेतली. मुनगंटीवार हे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत आहेत. हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. सरकार हे संख्याबळावर चालतं. धमक्या देणं योग्य नाही, असं सांगतानाच हल्लीच्या काळात राजकीय उद्देश ठेवून काम सुरू आहे, त्यामुळे मुनंगटीवार यांचं वाक्य कामकाजातून काढून टाकावं, अशी मागणी मलिक यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी मलिक यांची मागणी मान्य करत संबंधित विधान तपासून मुनगंटीवारांचं विधान कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- बिस्किटच्या डिझाईनच्या कॉपी प्रकरणी ओरियो पार्लेविरुद्ध न्यायालयात
- महाविकास आघाडीतुन काँग्रेस सर्वप्रथम बाहेर पडेल : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
- आता राहुल गांधींनी जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात – आशिष शेलार
- भाजप नेत्याचा तरुणीसोबतचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
- फडणवीस सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी होणार, अजित पवारांची विधानसभेत घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
