गोरखपूर- विवाहबाह्य संबंध आणि त्यातून पळून जाऊन संसार थाटणारी अनेक जोडपी आपणास पाहायला मिळतात. विवाहित पुरुष एखाद्या महिलेला किंवा तरुणीला घेऊन पळाल्याच्या घटना देखील नवीन नाहीत मात्र उत्तरप्रदेशातील एका घटनेमुळे पोलीस देखील चक्रावले आहेत.
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातील एक अत्यंत खळबळजनक घटना आहे. गोरखपूरच्या कॅम्पियरगंज गावातील एक विवाहित महिला जी तीन लेकरांची आई सुद्धा आहे ती महिला एका १४ वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे.
या घटनेनंतर या परिसरात मोठी खळबळ माजली असून संबंधित महिलेच्या पतीने पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. पतीच्या तक्रारीनंतर पोलीस या दोघांचाही कसून शोध घेत आहेत.महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून पत्नीचं गावातील एका १४ वर्षीय मुलासोबत प्रेमप्रकरण सुरु होतं.यानंतर दोघांमध्ये दुरावा आला होता.
यावरून दोघांमध्ये गेले काही दिवस वाद देखील होत होता. महाशिवरात्रीच्या दिवशी गावात जत्रा भरली होती. या जत्रेत ती तिच्या प्रियकरासोबत गेली होती. पण ती रात्री उशीरापर्यंत घरी परतलीच नाही.त्यानंतर आजूबाजूला तिचा शोधही घेतला. पण तिचा पत्ता काही लागला नाही.
मुलाच्या कुटुंबियांनी देखील तेच सांगितले की, महिलेसोबत फरार झालेला मुलगा हा सातव्या वर्गात शिकतो. महिलेनेच त्यांच्या मुलाला फूस लावून पळवून नेले आहे. विशेष म्हणजे मुलाच्या कुटुंबियांनीही पोलिसात तक्रार दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हाधिकारी चव्हाण यांचा ग्रामीण भागातही दणका
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- वर्षावर बैठकांचे सत्र सुरूच, अजित पवार पोहचले मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- राज्यात 18 ते 20 मार्च दरम्यान पावसाची शक्यता, जाणून घ्या कुठे पडू शकतो पाऊस?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

