🕒 1 min read
औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी चव्हाण यांनी चांगलेच मनावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दररोज अधिकारी, पदाधिकारी बैठका सोबतच स्वतः शहरात आणि ग्रामीण भागामध्ये फिरून कारवाई करताना दिसून येत आहे. वैजापूर येथील कोविड केयर सेंटरची पाहणी करण्यासाठी जात असताना गंगापूर आणि वैजापूर येथील रस्त्यावर कोरोना नियमांच उल्लंघन झाल्याच निर्दशनास येताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गाडी थांबवत ध्वनिक्षेपाच्या माध्यमातून जनजागृती केली.
यावेळी जात असताना गंगापूर येथील लासुर नाका परिसरात एका इलेक्ट्रॉनिक दुकानातील दुकानदार आणि फळविक्रेता यांनी नियमांचे पालन न केल्याचे दिसल्याने त्च्यायांवर कारवाई करत प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात बशीर आईस्क्रीम अँड कोल्डड्रिंक सेंटर यांच्याकडून आणि राजेश मेडिकल यांच्याकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने वसूल करण्यात आला.
यावेळी कोरोना नियमांच उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना कोरोनाचे भयंकर वास्तव समजावत त्रिसूत्रीचे महत्व जिल्हाधिकारी यांनी समजावून सांगितले. मास्क नसणाऱ्या व्यक्तींना मास्क दिले. तसेच मास्क न घातलेल्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई देखील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करण्यात आली. या कारवाईने मोठ्या प्रमाणात अधिकारी, व्यापारी आणि नागरिक धास्तावले आहे.
महत्वाच्या बातम्या
- वाझे सट्टेवाल्यांकडून खंडणी उकळतो आणि वरुण सरदेसाई त्यातून हिस्सा घेतो – नितेश राणे
- पडळकर फडणवीसांना म्हणाले ‘शेतकऱ्यांचे हृदयसम्राट’; नेटकऱ्यांनी धु-धु धुतले !
- वर्षावर बैठकांचे सत्र सुरूच, अजित पवार पोहचले मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला
- …म्हणून आगामी निवडणूकीत कुठल्याही पक्षासोबत युती नाही; मायावतींचा स्वबळाचा नारा
- राज्यात 18 ते 20 मार्च दरम्यान पावसाची शक्यता, जाणून घ्या कुठे पडू शकतो पाऊस?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
