🕒 1 min read
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानक उभारण्याकरिता मनपाकडून आकारण्यात आलेले सुमारे दीड कोटी रुपयांचे विकास शुल्क माफ करण्यात आले आहे. शुल्क माफीच्या संचिकेवर मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी स्वाक्षरी केली. यामुळे बसस्थानक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मध्यवर्ती बसस्थानक पाडून त्या जागेवर नवीन बसपोर्ट उभारण्यासाठी निविदा अंतीम करून बांधकाम परवानगीसाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता. मनपाने बांधकाम परवानगी देण्यापूर्वी विकास शुल्क म्हणून १ कोटी ६२ लाख रूपये भरण्यासंदर्भात एसटी महामंडळाला पत्र पाठवले होते. परंतु एसटी महामंडळाने पोलीस प्रशासनाला जशी शुल्क माफी करण्यात आली. त्या प्रमाणे विकास शुल्क माफी मिळावी अशी मागणी केली होती. या दरम्यान मनपाने मुकुंदवाडी येथील एसटी महामंडळाच्या कार्यशाळेची जागा स्मार्ट सिटीबससाठी डेपो करिता मागितली होती. या संदर्भात मुंबई येथे पालकमंत्री सुभाष देसाई आणि परिवहनमंत्री अॅड.अनिल परब यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत विकास शुल्क माफी आणि बसडेपोसाठी जागा देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली होती. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब हे जुलैमध्ये औरंगाबाद दौऱ्यावर आले असता मनपाच्या विकास शुल्क माफीसह मुकुंदवाडी येथील जागा सिटीबस डेपोसाठी देण्यासंदर्भात त्यांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये चर्चा झाली.
मनपाने विकास शुल्क माफी द्यावी, एसटी महामंडळाने सिटीबस डेपोसाठी लिजवर जागा देण्यासंदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी आदेश दिले. त्यानुसार मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर नवीन बसपोर्ट उभारण्यासाठी महापालिकेकडून आकरण्यात आलेला १ कोटी ६२ लाख रूपयाचा विकास शुल्क माफ करण्यात आला. शुल्क माफीच्या संचिकेवर मनपा प्रशासक पाण्डेय यांनी स्वाक्षरी केल्यानंतर याबद्दलची माहिती माध्यमांना दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं ठाकरे सरकारच झिंगलंय कारण कुटुंब वसुलीत रंगलय’
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
- ठरलं ! 17 ऑगस्टपासून राज्यातील ‘या’ इयत्तेचे वर्ग भरणार
- नांदेड विभागातून तीनशेवी किसान रेल्वे सुसाट; महसूलात कोटींनी वाढ!
- मंत्रिमंडळ “खो खो” आणि अनिल देशमुख सध्या लपाछपी खेळताय, भाजपचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
