लातूर: मांजरा धरणातून उजव्या व डाव्या कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अनाधिकृत उपसा तातडीने थांबवुन कॅनॉलच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी, कासारखेडा व परीसरातील गावांनाही नदीव्दारे पाणी सोडावे, आठ दिवसात कार्यवाही पूर्ण करून अहवाल सादर करावा असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
गुरूवार दि. १५ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री विलासराव देशमुख यांनी या बैठकीदरम्यान अधिकार्यांना सूचना दिल्या. या बैठकीत शेतकरी प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पालकमंत्री देशमुख यांनी मांजरा धरणातील पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा, अपव्यय टाळावा, कॅनॉलचे अस्तरीकरण व्यवस्थित करून करून अनाधिकृत उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी, त्याचबरोबर कॅनलच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणीपुरवठा व्हावा. धरणाच्या कमांड एरिया मधील कासारखेडा व परिसरातील गावांनाही नदीच्या पात्राद्वारे पाणीपुरवठा करावा, असे निर्देश दिले आहेत. तसेच तात्काळ नियोजन करून मांजरा धरण क्षेत्रातील कालव्यातून सर्व शेतकऱयांना शेतीसाठी पाणी पुरवठा सुरळीतपणे कसा देता येईल यासाठी कारवाई करावी, कालवा समिती बैठकीत ठरल्या प्रमाणे शेतकऱ्यांना सुरळीत पाणी कालव्यातून उपलब्ध करून दिले जावे अशा सूचना या वेळी अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- विनाकारण भटकणार्यांना परभणी पोलिसांनी दाखवला हिसका
- कोरोना झालेल्या पतीच्या निधनानंतर पत्नीची चिमुकल्यासह तलावात उडी घेत आत्महत्या
- पुण्यात कोरोनाचा हाहाकार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘या’ तारखेपर्यंत राहणार बंद !
- बेपत्ता तरुणाचे कुजलेले प्रेत झाडावर आढळून आले लटकलेल्या अवस्थेत
- उसनवारीच्या पैशातून धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला! पंधरा वर्षीय युवक ठार, दोघे गंभीर जखमी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

