पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे स्थिती अत्यंत बिकट बनली असून आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत आहेत. देशात सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्णांच्या जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा हा अव्वल आहे. यामुळेच, पुण्यात राज्य सरकारच्या नियमावलीनुसार कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
दरम्यान, खबरदारी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सध्या या विद्यापीठाच्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा सुरु आहेत. या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा विभागातील कर्मचारी 50 टक्के क्षमतेने काम करतील अशी माहिती देण्यात आली आहे. यासोबतच, हा निर्णय आजपासून (१५ एप्रिल) लागू करण्यात आला असून सर्व शैक्षणिक विभाग बंद राहणार असल्याने कोणीही विद्यापीठात येऊ नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : कडक निर्बंधांना कोणी जुमानेना, आता निर्बंध आणखी कठोर होण्याची शक्यता !
- ‘आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला’
- फोन कोणत्या तोंडाने करायचा ?असा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले असावे
- सर्क्युलरच्या गोंधळामुळे पुण्यात गरिबांना शिवभोजन थाळीसाठी मोजावे लागले पैसे !
- कोरोना झाल्यावर सचिन तेंडुलकरने रुग्णालयात दाखल व्हायला नको होते; मविआ मंत्र्याची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

