🕒 1 min read
पैठण : पैठण तालुक्यातील टेकडी तांडा येथील पवार कुटुंबात उसनवारीने दिलेल्या पैशांवरुन वाद सुरु होता. याप्रकरणी एकमेकावर गुन्हे दाखल करून टेकडी तांड्या कडे जात असतांना रात्री दहा वाजेच्या सुमारास कारकीन रस्त्यावर अंधारात दबा धरून बसलेल्या विष्णू पवार याने समोरून येणाऱ्या मोटरसायकलवरील वडील, मुलगा, आई या तिघांवर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये १५ वर्षीय मुलगा संकेत ज्ञानेश्वर पवार याचा मृत्यू झाला असून आई-वडील दोघेही गंभीर जखमी आहेत.
गुन्ह्यातील आरोपी विष्णू पवार याला पोलिसांनी रात्रीच दोन तासात पाठलाग करून नेवासा जवळ ताब्यात घेतले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ज्ञानेश्वर पवार आणि विष्णू पवार दोघे आपल्या कुटुंबासह टेकडी तांड्यावर राहतात. विष्णू पवार याने ज्ञानेश्वर यांच्याकडून हातउसने म्हणून काही पैसे घेतले होते. ते पैसे परत मागण्यासाठी ज्ञानेश्वर गेला असता विष्णू पवार याने शिवीगाळ केली म्हणून दोन्ही पवारांनी मंगळवार रोजी संध्याकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर तक्रारी दिल्या.
कारकीन रस्त्याने ज्ञानेश्वर, हिराबाई पवार, मुलगा संकेत दुचाकीवरून येत होते. यावेळी विष्णू पवार याने धारदार शस्त्राने सपासप तिघांवरती वार सुरू केले. तिघे गंभीर अवस्थेत पडलेले पाहून विष्णू पवार हा त्या ठिकाणाहून मोटरसायकल घेऊन पसार झाला. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच आयपीएस गोरख भामरे, सपोनी अर्चना पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. व गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता १५ वर्षीय संकेत पवार याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
मयताची आई हिराबाई पवार वडील ज्ञानेश्वर पवार हे गंभीर जखमी झालेले आहेत. या दोघांवर उपचार सुरू आहे. बुधवार रोजी सकाळी संकेतचे शवविच्छेदन करून अंत्यविधी टेकडी तांडा या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात करण्यात आला असून एमआयडिसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शेवटपर्यंत दोन्ही बछड्यांना तिने प्रेमाने जवळ घेतले नाही…अखेर मायेच्या स्पर्शाविना दोघांनी सोडला जीव!
- कोरोना झाल्यावर सचिन तेंडुलकरने रुग्णालयात दाखल व्हायला नको होते; मविआ मंत्र्याची टीका
- प्रेयसीच्या नकाराने तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
- फोन कोणत्या तोंडाने करायचा ?असा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले असावे
- कोरोना रुग्णांकरीता ऑक्सिजन मिळवण्याचा प्रवास झाला सोप्पा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

