Share

विनाकारण भटकणार्‍यांना परभणी पोलिसांनी दाखवला हिसका

Published On: 

🕒 1 min read

परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदी दरम्यान रस्त्यावरून विनाकारण भटकणाऱ्यांना पोलिसांनी गुरुवारी हिसलका दाखवला. अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरीक्त दुकाने उघडी ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी गुरुवारी कडक शब्दात दम देत कारवाई करण्याचा इशारा देखील दिला.

शहरातील सर्व वरिष्ठ पातळीवरील पोलिस संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्य बाजारपेठेत गुरुवारी दाखल झाले. या मध्ये जनता मार्केट, कच्छी बाजार, शिवाजी चौक, गुजरीबाजार, गांधीपार्क, आष्टभुजा चौकासह वसमत रोड, गंगाखेड रोड, जिंतुर रोड, सेलू रोडसह आदी भागात फेरफटका मारला. त्यावेळी अत्यावश्यक सेवांव्यतिरीक्त काही दुकाने उघडी दिसली. या वेळी डॉ. कुंडेटकर यांनी थेट त्या कठोर शब्दामध्ये समज दिली. यापुढे दुकाने उघडी दिसल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील दिला. दरम्यान फेरफटका मारतेवेळी काही वाहनधारकांना रस्त्यामध्ये थांबवून त्यांच्या फिरण्या मागील कारणे देखील विचारली.

काहींनी अडचणी तर काही किरकोळ कारणे सांगितली. अत्यावश्यक कारण असल्याशिवाय बाहेर पडू नका, असा वाहनधारकांना दम या या वेळी दिला. काही युवकांनी पोलिसांचे वाहन दिसताच पळ काढला. पोलिसांच्या फेरफटक्याने मुख्य बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त सुरु असलेली दुकाने क्षणार्धात व्यापाऱ्यांनी बंद केली. गर्दीची असलेली ठिकाणे निर्मनुष्य झाल्याचे यावेळी पहावयास मिळाले. दरम्यान, संचारबंदीचे उल्लंघऩ करणाऱ्या व्यक्ती व व्यापाऱ्यांविरुद्ध आपण माणूसकीच्या दृष्टीकोनातून आज दंडात्मक कारवाई केली नाही. मात्र, सातत्याने व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली तर नाईलाजास्तव दंड आकारावा लागेल असे आवाहन या वेळी पोलिस अधिकारी यांच्याकडून करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!