जालना: सोमवारी म्हणजे २२ मार्चला जल दिन साजरा केला जातो. मात्र जालन्यात जलदिनीच लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली आहे. भोकरदन शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा एकदा फुटल्याचा प्रकार येथे घडला आहे. दानापूर येथून भोकरदन शहराला पाणीपुरवठा या जलवाहिनीतून केला जातो. मात्र मागील महिन्यापासून अनेक वेळा ही जलवाहिनी फुटण्याचा प्रकार घडला आहे.
दानापूर धरणातून आन्वा रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी सोडले जाते व तेथून शहरातील विविध भागातील जलकुंभात पाणी टाकून शहराला पाणी पुरवठा केला जातो. ही जलवाहिनी ३० वर्षापूर्वीची आहे व काही ठिकाणी जीर्ण झाली असून अनेकवेळा फुटली आहे. जलशुद्धीकरण केंद्रापासून काही अंतरावर असलेल्या आन्वा फाट्याजवळ जलवाहिनी फुटण्याचा अनेकवेळा प्रकार घडला आहे.
सोमवारी पाणी वाचवा पाणी जिरवा असा संदेश जलदिनानिमित्त दिला जात असतो, मात्र भोकरदन मध्ये पाण्याची नासाडी झाल्याचे चित्र समोर आले आहे. सिमेंटची असलेली जलवाहिनी अत्यंत जुनी झाली आहे. पाण्याचा अधिक दाब पडल्यास काही ठिकाणी फुटक आहे, पाच ते सहा ठिकाणी जलवाहिनीला गळती आहे. दुरुस्तीचे लवकरच काम पूर्ण होईल, अशी माहिती पालिकेचे पाणीपुरवठा निरीक्षक दीपक सिंगल यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नैतिकतेचा इतकाच पुळका असेल तर पहिले नवनीत राणा यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा – चाकणकर
- लहान बहीणीचचा स्वेटर अन आईची साडी, अजब लूकमुळे गायत्री ट्रोल !
- अखेर बेन स्टोक्सने सांगितले इंग्लंडच्या पराभवाचे कारण…
- तेलंगाणामध्ये कब्बडी स्पर्धेच्या सोहळ्यादरम्यान गॅलरी कोसळून अपघात
- ‘आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

