Share

अखेर बेन स्टोक्सने सांगितले इंग्लंडच्या पराभवाचे कारण…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पाच टी20 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना अखेर भारतीय संघाने पाचव्या आणि निर्णायक क्रिकेट सामन्यात बाजी मारली. दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या बळावर संघाला हे यश संपादन करण्यात आलं. इंग्लंड संघापुढं रोहित शर्माच्या वादळी ३४ चेंडू मधील ६४ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांमध्ये २२५ धावांचं आव्हान ठेवले होते. हा धावांचा डोंगर उभा करण्यासाठी कर्णधार विराट कोहली याने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची आक्रमक खेळी केली.

तर सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी अनुक्रमे १७-१७ चेंडूंत ३२ आणि ३९ धावा चोपल्या. यासह भारताने ही 5 सामन्यांची मालिका 3-2 ने जिंकली. या सामन्यात इंग्लंड कडून बेन स्टोक्स वगळता इतर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. यानंतर बेन स्टोक्सने सामना झाल्यावर बोलताना, इंग्लंडचा संघ सहज विजय मिळवेल असे वाटत होते, परंतु शार्दुल ठाकूरने एकाच षटकात दोन गडी राखून सामन्याला कलाटणी दिल्याचे सांगितले.

चौथ्या सामन्यात इंग्लंडकडून 46 धावांची खेळी करणाऱ्या बेन स्टोक्सने संघाच्या पराभवावर बोलताना, सुरवातीच्या फळीतील फलंदाजांवर खापर फोडले. त्याने संघाच्या कोणत्याही वरच्या फळीतील फलंदाजांनी शेवटपर्यंत फलंदाजी करायला हवी होती, असे मत व्यक्त केले. व यासाठी कारण देताना, मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी खालच्या फळीतील खेळाडूंवर अवलंबून राहणे आदर्श म्हणता येणार नसल्याचे सांगितले. मोठ्या लक्ष्याच्या पाठलाग करताना, सुरवातीचा कोणताही फलंदाज शेवटपर्यंत किंवा काही काळ तरी मैदानावर राहणे गरजेचे होते. आणि तसे झाले असते तर नक्कीच संघाचा विजय झाला असता असे बेन स्टोक्स म्हणाला.

याशिवाय आगामी शेवटच्या व निर्णायक सामन्याबाबत बोलताना, आम्हाला विजय मिळवण्याची सवय करून घ्यावी लागणार असल्याचे बेन स्टोक्सने पुढे नमूद केले. तसेच, दबाव परिस्थितीत जितके जास्त चांगले खेळता येईल त्याचा पुढे फायदा होणार असल्याचे बेन स्टोक्स म्हणाला. आणि या गोष्टीचा सर्वात अधिक फायदा यावर्षी भारतात खेळल्या जाणार्‍या टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत होणार असल्याचे त्याने अधोरेखित केले. व या स्पर्धेत प्रत्येक सामना हा महत्वाचा राहणार असल्याचे तो पुढे म्हणाला. त्यानंतर, या मालिकेच्या माध्यमातून इंग्लंडचा संघ टी-ट्वेन्टी वर्ल्डकपचीही तयारी करत असल्याचे बेन स्टोक्सने पुढे सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!