मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकार विविध मुद्यांवरून अडचणीत पाहायला मिळत आहे.सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी नुकतेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीबाबत आरोप करून खळबळ माजवून दिली होती. या प्रकरणात नाट्यमय घडामोडी आणि बैठकांचं सत्र सुरू आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली.
दरम्यान, या प्रकरणावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. काल लोकसभेत देखील हा मुद्दा चांगलाच गाजला. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीवर अनेक आरोप करत महाराष्ट्रात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी देखील त्यांनी केली होती.संसदेत बोलताना नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.खासदार नवनीत राणा कौर यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच लक्ष्य केले.
उद्धव ठाकरे हे फडणवीसांनंतर मुख्यमंत्री झाले त्यांनी खुर्चीवर बसताच परमबीर सिंग यांना निर्देश दिले की सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घ्या. सचिन वाझेंना नियम डावलून सेवेत घेण्यात आलं. सचिन वाझेंवर एवढे गंभीर आरोप झाले तेव्हा परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. महाराष्ट्रात हे असे प्रकार घडू लागले तर एक वेगळी परंपरा राज्यात पडेल त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली गेली पाहिजे.’ अशी मागणी नवनीत राणा कौर यांनी केली.
दरम्यान,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर आता टीका केली आहे. नवनीतजी राणा आपल्याला जर नैतिकतेचा एवढा पुळका आला असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा , कारण आज तुम्ही खासदार म्हणून जी भूमिका संसदेत मांडली आहे ती खासदारकी तुम्हाला राष्ट्रवादीच्या जीवावर मिळालेली आहे म्हणून मांडता आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फेरफारासाठी लाच स्वीकारणारा मंडळ अधिकारी, सरपंच अटकेत
- जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती; हे मिम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही !
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावर ताहिरा कश्यपचं बिकिनी परिधान करून चोख उत्त्तर…..
- …म्हणून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; पवारांची ठाम भूमिका


