Share

तेलंगाणामध्ये कब्बडी स्पर्धेच्या सोहळ्यादरम्यान गॅलरी कोसळून अपघात

Published On: 

हैदराबाद : ४७ वा राष्ट्रीय ज्युनियर कब्बडी स्पर्धेच्या सोहळ्यादरम्यान  तेलंगाणाच्या सूर्यापेटमधील स्टेडियममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. लोकांची गर्दी प्रचंड झाल्यामुळे अचानक एक गॅलरी तुटून खाली कोसळली. त्यामुळे या दुर्घटनेत १०० हून जास्त लोक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

या दुर्घटनेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, अद्याप दुर्घटनेत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मात्र यामध्ये दोन  लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे पाठवण्यात येणार आहे. या गॅलरीत जवळपास १५०० लोक खाली पडले असल्याचे सांगण्यात आले आहे. समोर आलेल्या व्हिज्युअल्समध्ये गॅलरी कोसळल्यामुळे लोक खाली पडताना दिसत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात कमकुवत लाकूड आणि इतर साहित्याने बनवलेल्या संरचनेमुळे झाला आहे. मात्र याचा अधिक तपास केला जाणार असून या दुर्घटने मागच नेमक कारण स्पष्ट करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!