मुंबई : सेलिब्रिटी मंडळी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यातच आत्ता सध्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ईशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातार चर्चेत आहे. पण गायत्री हि तिच्या अभिनयामुळे किंवा नवीन मालिकेमुळे चर्चेत नाही तर एका दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आहे.
गायत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांशी संपर्कात असते. ती नेहमीच तिचे नवनवीन प्रोजेक्ट व्हिडीओ आणि वेगवेगळ्या मूडमधील फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. अशातच तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सेलिब्रेटी बऱ्याचदा हटके फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्याच्या कपड्यांवरून त्याची खिल्लीही उडवली जाते. असाच काहीसा प्रकार गायत्रीबरोबरही घडल्याचे पाहायला मिळत आहे. एका पुरस्कार सोहळ्यात गायत्री दातारने लाल रंगाची साडी परिधान केली होती. या साडीवर तिने पांढरा कलरचा ब्लाऊज परिधान केला होता. मात्र साडीच्या वर घातलेला ब्लाऊज स्वेटर सारखा दिसत असल्यामुळे गायत्री ट्रोल झाली.
https://www.instagram.com/p/CMrsJ0LhDeL/?utm_source=ig_web_copy_link
गायत्री दिवसेंदिवस फॅशनच्या बाबतीत सजग बनत चालली आहे. मात्र कधी कधी एक्सप्रिमेंट करणेही फसतं आणि अशा प्रकारे ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. या साडीमध्ये गायत्री सुंदर दिसत असली तरी विचित्र कॉम्बिनेशनमुळे साडीवर ते हवे तितके उठून दिसत नसल्याचे चाहत्यांना वाटले. त्यामुळे तिच्या या फोटोवर कमेंट्सद्वारे अनेकांनी या लूकसाठी पसंती दिली तरी काहींनी नापसंतीही दिल्याचे पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या
- शेती नंतर ‘कॅप्टनकूल’ धोनीचा मोर्चा व्यवसायाकडे
- आखेर विराट कोहलीने सोडले पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर मौन
- “रोहित शर्माचा नाद नाही करायचा तो टी-२० मध्ये सुद्धा द्विशतक ठोकू शकतो”
- मालिका गमावण्याचा असाही फायदा.. इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनचे मोठे वक्तव्य
- भारतीय संघासाठी वाईट बातमी?…कर्णधार कोहली होऊ शकतो संघाबाहेर


