Share

“…त्यात विलन एक इच्छाधारी नाग असतो अन्”, निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

Published On: 

मुंबई: एमआयएमने महाविकास आघाडीला आघाडीची ऑफर दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी काल (२० मार्च) यावर  प्रतिक्रिया दिली. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचं. आम्ही काय मूर्ख नाही. असे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. यावरच आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

“मुख्यमंत्र्यांच्या FB लाईव्ह चे ठळक मुद्दे- अंगार, भंगार, मी सगळीकडे फिरणार आणि दिसणार. हे ऐकून मला एक जुना पिक्चर आठवला ‘जानी दुश्मन‘, त्यात विलन एक इच्छाधारी नाग असतो, त्याचा डायलॉग आहे ‘मे अभि सब जगा देखुंगा‘.”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ठाकरे?

शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाने केलेल्या युतीची आठवण करुन देत म्हटलं की, “मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत” तसेच आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे त्यामुळे जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार राहा. असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!