मुंबई: आयपीएल २६ मार्चपासून सुरू होत आहे, ज्यातील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करताना दिसत आहेत. यावेळी आयपीएलचे या हंगामातील सर्व सामने महाराष्ट्रात होणार आहेत, त्यामुळे चेन्नई वगळता सर्व संघ मुंबईत आपला बेस कॅम्प लावत आहेत.
चेन्नईच्या मास्टरमाइंड धोनीने (ms dhoni) त्यांचा कॅम्प चेन्नई येथे लावला आहे. मुंबईत सामने असून कॅम्प सुरतला का याचे उत्तर कोच स्टीफन फ्लेमिंग (stephan fleming) यांनी दिले आहे. त्यांनी सांगितले की, “मुंबईत साहजिकच आव्हान आहे की सर्व संघ तिथे प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे आम्हाला सुरतला यावे असे वाटले. तांबडी माती आणि हवामानाच्या बाबतीत ते मुंबईसारखेच आहे. ते फार दूर नाही आणि मुंबईसारखेच आहे. पण या मैदानाची मालकी आणि खुल्या विकेट्स आणि लांब नेट सत्रे खेळणे खूप मौल्यवान आहे.”
कोच फ्लेमिंगच्या वक्तव्यानंतर स्पष्ट झाले आहे की, सुरतमध्ये प्रशिक्षण शिबिराची पीच आणि IPL मध्ये वापरलेली पीच जवळपास सारखीच आहे. सुरतमध्येही मुंबईप्रमाणे लाल मातीच्या पीच आहेत. यामुळे आता चेन्नईने सुरतमध्ये शिबीर ठेवण्यामाघील कारण उघड झाले आहे. चेन्नई प्रमाणेच गुजरात टायटन्स संघही अहमदाबादमध्ये ट्रेनींग घेत आहे. चेन्नईच्या पहिल्या सामन्यानंतर कळेल की त्यांचा हा निर्णय कितपत बरोबर ठरला.
महत्वाच्या बातम्या
- “भाजपच्या पाठबळामुळेच या…”, ‘द कश्मीर फाइल्स’वरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका
- महाराष्ट्राच्या दुश्मनांसाठी शिवचरित्र हा एक धडा आहे- संजय राऊत
- ‘आयपीएलनेच मार्केट बनवलंय’ पाकिस्तानी पत्रकाराला रॉबिन उथप्पाचे सडेतोड उत्तर
- एमआयएमने दिलेल्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा एक राजकीय…”
- भारीच ना..! पुन्हा रंगणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; वर्ल्डकपपूर्वी ‘या’ स्पर्धेची झाली घोषणा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

