Share

‘आयपीएलनेच मार्केट बनवलंय’ पाकिस्तानी पत्रकाराला रॉबिन उथप्पाचे सडेतोड उत्तर

Published On: 

मुंबई: आयपीएल विरुद्ध पीएसएल या वादाने अलीकडे सोशल मीडियावर जोर धरला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी यापूर्वीच पीएलला आयपीएलपेक्षा भारी बनवणार असल्याचे सांगितल. जेव्हा जेव्हा असे दावे केले जातात तेव्हा भारतीय क्रिकेट चाहते त्यांचा प्रतिकार करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. आता भारताचा क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यानेही या लढ्यात पाऊल ठेवले आहे.

रॉबिन उथ्थपाने (robin uthappa) एका पाकिस्तानी पत्रकाराला सडेतोड उत्तर दिले आहे. झाले असे की , पाकिस्तानी पत्रकार अरफा फिरोज झकेने ट्विट करत सांगितले की PSL अशा युगात वेगाने वाढली, जिथे इतर राष्ट्रे देखील त्यांच्या संबंधित T20 लीगचे आयोजन करत आहेत. जरी त्याने कबूल केले की आयपीएल आणि पीएसएलमध्ये ‘कोणतीही तुलना’ नाही, परंतु ‘बाजारात’ स्पर्धकांच्या कमतरतेमुळे आयपीएल यशस्वी झाल्याचे त्याने  सांगितले.


https://twitter.com/codencric/status/1505081442610651136?s=20&t=B00oAPvZ4l5XaSBFLOX-xg

अरफाच्या या ट्विटला प्रतिउत्तर देत रॉबिन उथ्थपाने लिहले,”आयपीएलने मार्केट बनवलंय”. उथ्थपाच्या या ट्विटनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी त्या ट्विटखाली मजेशीर प्रतिक्रिया देणे सुरु केले. रॉबिनचे ते ट्विट मोठ्या संख्येत व्हायरल होत आहे. रॉबिन उथ्थपा लवकरच चेन्नईकडून आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!