Share

एमआयएमने दिलेल्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा एक राजकीय…”

Published On: 

बारामती : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही यावर भाष्य केले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शरद पवार म्हणाले की,‘कोणाला कोणत्या पक्षासोबत जायचे हे ते स्वत: सांगू शकतात. परंतु ज्यांच्यासोबत जायचे आहे, त्या पक्षांनी तर प्रस्तावावर हो म्हणायला हवे’, असे पवार म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘हा एक राजकीय निर्णय असून हा प्रस्ताव महाराष्ट्रापुरता केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अशाप्रकारच्या राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला देत नाही. राज्यामध्ये अशाप्रकारचा निर्णय आपण घेऊ शकतो हे जोपर्यंत पक्षाची राष्ट्रीय समिती स्पष्ट करत नाही तोपर्यंत अशाप्रकारची भूमिका घेता येणार नाही’, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!