Share

पुण्यातील विजय विराट कोहलीसाठी ठरला खास

Published On: 

पुणे : रविवरी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेतील तिसरा सामना झाला. या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. या निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या षटकांत इंग्लंडला विजयासाठी 6 चेंडूत 14 धावांची आवश्यकता होती, मात्र नटराजनने अचूक गोलंदाजी करताना केवळ 6 धावा दिल्या आणि भारताने विजय साकार केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.

विराट कोहलीने कर्णधार म्हणून आपला 200 वा आंतरराष्ट्रीय सामना अविस्मरणीय बनवला. कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने 130वा विजय मिळवला आहे. सर्व फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विजय प्राप्त करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर प्रथम क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. पाँटिंगच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने 152 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

तर दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नेतृत्त्वात दक्षिण आफ्रिकेने 111 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचेही नाव या यादीत समाविष्ट आहे. त्याच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने 109 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. धोनी यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!