मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक उपाययोजना राज्यभरात राबवल्या जात आहेत. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा झाल्याचे त्याने स्वतःच ट्विट करत शनिवारी सांगितले. त्याच्या पाठोपाठ आता भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणलाही कोरोनाची लागण झाली आहे. युसूफनेही स्वतः ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. ‘माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि आक्रमक फलंदाज युसूफ पठाण यांच्यानंतर आता स्टार क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथला देखील करोनाची लागण झाली आहे.विशेष म्हणजे बद्रीनाथ सुद्धा रोड सेफटी स्पर्धेत सहभागी होता. त्यामुळे वर्ल्ड रोड सेफटी स्पर्धा अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
— S.Badrinath (@s_badrinath) March 28, 2021
आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती बद्रीनाथने ट्विट करत दिली. बद्रीनाथ म्हणाला, ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला या आजाराची सौम्य लक्षणे आहेत. मी करोनासंबधित नियमांचे पालन करत असून घरी क्वारंटाइन झालो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य ती काळजी घेत आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ये बॅट हमको दे, दे ठाकूर ; शार्दुलच्या शानदार षटकारावर स्टोक्स फिदा
- ‘रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो ‘या’ दोघांनाही मागे टाकेल’
- शार्दुल-भुवनेश्वरला पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, म्हणाला…
- विजयाचा गुलाल लावत टीम इंडियाची होळी साजरी
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला कोव्हिड वॉर रुमचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

