Share

‘केवळ नोटीस लावून प्रश्न सुटतो का? त्यांना पर्यायी घरे कोण देणार?’ ; दरेकरांचा सवाल

Published On: 

मुंबई : काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यासह भिंत, इमारत कोसळून दुर्घटना झाल्या आहेत. तीन दुर्घटनांमध्ये २५ हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणल्या होत्या कि, ‘महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा जाऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नाहीत. मग अशावेळी महापालिका किंवा एखादी यंत्रणा कारवाई करायला जाते. त्यावेळी त्याला विरोध होतो. चेंबूरमधील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं. त्याठिकाणच्या नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगण्यात आलं होतं. तुमची घरं दरडीच्या खालीच आहेत, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं,’ अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली आहे.

यावर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले कि, ‘केवळ पालिकेने धोक्याची नोटीस बजावून त्यांची जबाबदारी सुटत नाही. त्या रहिवाशांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची जबाबदारीही मुंबई महापालिकेची आहे. नोटीस लावून प्रश्न सुटतो का? त्यांना पर्यायी घरे कोण देणार?’ असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच यावर बोलताना ते म्हणाले कि, ‘माणूस आपला जीव गेला तरी चालेल पण आपले छोटे घर का सोडत नाही. कारण ते घर त्यांच्या मेहनतीने घेतलेले असते आणि दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन त्याला राहावे लागते. जर आपण पालिका व प्रशासनाने त्यांची पर्यायी व्यवस्था केली, तर लोक त्या ठिकाणी मरणार नाही.’ असे देखील ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!