Share

श्रीलंकेविरुद्ध शिखर धवनने नोदंवले अनेक ‘गब्बर’ विक्रम

Published On: 

मुंबई : श्रीलंका दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने दिलेल्या २६३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३ गडी गमावत सहज पार केले. वेगवान खेळीसाठी सलामीवीर पृथ्वी शॉला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनने केले. धवनने या सामन्यात १७ धावा पुर्ण करताच श्रीलंकेविरुद्ध सर्वात वेगवान १००० धावांचा टप्पा ओलांडणारा फलंदाज बनला आहे. श्रीलंकेविरुद्ध १७व्या डावात धवनने ही कामगिरी केली आहे. यापुर्वी हाशीम आमलाने १८ डावात ही कामगिरी केली होती. त्यानंतर सौरव गागुंली(२०) आणि क्विटंन डिकॉक(२१) यांचा समावेश होतो.

तसेच यासामन्यात २७ धावांचा टप्पा ओलांडताच धवनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून ६००० धावा करण्याचा विक्रम केला आहे. अशी कामगीरी करणारा धवन हा १०वा भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच ६००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. १४० डावात धवनने ही कामगिरी केली. तर जागतीक क्रिकेटमध्ये तो जलद ६००० धावा पुर्ण करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने १०,००० धावाही पुर्ण केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!