Share

शेती मशागतीत यंत्राचा वापर वाढला, डिझेल दर वाढीने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

Published On: 

औरंगाबाद : गत वर्षी शेती तयार करण्यासाठी जो खर्च लागत होता, त्या खर्चात मात्र दुपटीने वाढ झाली आहे. एक एकर शेती तयार करण्यासाठी नांगरणी, वखरणी अल्प प्रमाणात होती. यावर्षी मत सर्व शेतीची मशागत यंत्राच्या साह्याने करावी लागत असल्याने ट्रॅक्टरचे दर वाढले आहे. डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ट्रॅक्टरचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेती पेरणीसाठी तयार करणे ही तारेवरची कसरत झाली आहे.

चारा टंचाईमुळे शेतक-यांना बैलजोडी ठेवणे कठीण झाले आहे. त्यामुळे, शेती मशागतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात शेतक-यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. नांगरणी, वखरणी, आदी कामे सुरू केली आहेत. कोरोना संकटाशी सामना करीत असतानाच शेतकरी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी राजा यंदा नव्या जोमाने पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला दिसत आहे.

मागील पाच-सात वर्षांपासून शेतक-यांवर नैसर्गिक दुष्काळी संकटे येत आहेत. परंतु शेतकरी राजा अजूनही निसर्गाशी सामना करतो आहे. जमिनीचा पोत, जडणघडण सुधारण्यासाठी पूर्वमशागतीची कामे करताना दिसत आहे. कोरोना पाश्र्वभूमीवर शेतकरी दोन महिन्यापासुन आपापल्या घरामध्येच होता. मात्र, शेतकरी वर्गाने घरीच राहून चालणार नाही. शासनानेही याकरिता कृषी क्षेत्राला काही नियम, अटी लागू करून शेतीची कामे व शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याला मान्यता दिल्यामुळे शेतकरी पेरणीपूर्व मशागत कामात व्यस्त आहे. शेतकरी शेतातील काडी कचरा, शेणखत, नांगरणी असली कामे करीत आहे. खरीप हंगाम लवकरच सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!