औरंगाबाद : कमीत कमी जागेत जास्तीत-जास्त झाडांची लागवड हा जपानच्या मातीतून फुलून आलेली ‘मियावाकी घनवन प्रकल्प‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात साकारल्या जाणार आहे. अवघ्या अर्धा एकर जागेत पाच हजार झाडांची या अंतर्गत लागवड करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारणार आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते गुरुवारी केले. यावेळी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, इकोसत्व‘च्या संचालक नताशा झरीन, रासेयो संचालक डॉ. टी. आर. पाटील, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, उद्यान अधिक्षक डॉ. गोविंद हुंबे, भारत अभियानच्या प्रकल्प अधिकारी आम्रपाली त्रिभुवन, प्रकल्प व्यवस्थापक सिध्दार्थ इंगळे, प्रेम राजपूत आदींची उपस्थिती होती. या प्रकल्पांतर्गत विद्यापीठ विश्रामागृह परिसरातील पीएच डी वसतीगृहच्या जवळची जागा अर्धा एकर जागा वापरण्यात येणार आहे. साठ विविध प्रकारची ५ हजार झाडे अवघ्या अर्धा एकर जागेत वापरण्यात येणार आहेत. येत्या मे पर्यंत वृक्षरोपण करण्यात येणार आहे. या प्रकल्पास ‘इकोसत्व एन्हार्यमेंट सोलूशन्स‘ ही संस्था मदत करणार आहे.
औरंगाबादकरांची ‘ऑक्सीजन हब’ : कुलगुरु
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर ही औरंगाबादकरांची ‘ऑक्सीजन हब‘ म्हणून ओळखले जाते. वाढत्या शहरीकरणातुळे ‘सिमेंट‘ चे जंगल निर्माण होत आहे. अशा काळात विद्यापीठ परिसर अधिकाधिक हिरवा व नैसर्गिक ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वीला संधी नाहीच
- राज्य सरकारचे ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष, चंद्रशेखर बावनकुळे उतरणार रस्त्यावर
- अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ
- विमाक्षेत्रात एफडीआयचे प्रमाण ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के इतके वाढवले
- गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

