Share

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वीला संधी नाहीच

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पुणे येथे होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी झाली. चौथ्या टी-२० सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा सुर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. संघाचे कर्णधारपद हे विराट कोहलीकडे  देण्यात आले तर रोहित शर्माला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही मालिका येत्या २३ मार्चपासून पुणे येथे खेळवण्यात येणार आहे.

खराब कामगीरीमुळे संघाबाहेर झालेल्या पृथ्वी शॉसाठी संघाचे दरवाजे अजुनही बंदच आहेत. पृथ्वी शॉने विजय हजारे करंडक स्पर्धेत धावांची बरसात केली होती. मात्र आयपीएलमध्ये केकेआर संघाकडून चमकदार कामगिरी करणारा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान देण्यात आलेले आहे. या मालिकेद्वारे कृणाल पांड्याचे एकदिवसीय अंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण होत आहे. कृणाल पांड्या हा २०१८ पासून टी-२० सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करतो. बीसीसीआयने टि्वट करत याबाबत माहिती दिली आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक –

२३ मार्च – पहिला सामना
२६ मार्च – दुसरा सामना
२८ मार्च – तिसरा सामना (सर्व सामने पुण्यात खेळवले जाणार)

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!