🕒 1 min read
नवी दिल्ली : राज्याचे गृमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या सहा जनपथ या दिल्लीतील बंगल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख सकाळी दहा वाजताच्या सुमारास दाखल झाले. शरद पवार अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राजधानी दिल्लीत आहेत. संसदेतून परतल्यानंतर शरद पवारांची अनिल देशमुखांनी भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना वेग आला आहे. त्या प्रश्भूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढत आहे. अनिल देशमुख यांची खुर्ची वाचली, मात्र मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची बदली करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर कोरोनाचे सावट; आयसीसीने पात्रता फेरी केल्या स्थगित
- नवजात बालकाच्या शरीरात आढळल्या कोरोना व्हायरसच्या अँटिबॉडिज
- साराअली खान आणि श्रद्धा कपूरच्या मेकअप आर्टिस्टमध्ये जुंपली
- ‘ते दोन अधिकारी खरं बोलले तर आर्थर रोड जेल हे नवीन मातोश्री होऊ शकतं’
- मुंबई पोलीस दलात कोणत्याही विभागात विशेष पथक नसेल, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचा पहिला निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
