Share

अक्षयकुमारने ‘ रामसेतू’ चित्रपटचा आयोध्येतून केला शुभारंभ

Published On: 

🕒 1 min read

आयोध्या : बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार याचा आगामी ‘ रामसेतू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचा मुहूर्त अयोध्येत रामलला दरबारात पूजापाठ करून करण्यात आला आहे. यावेळी अक्षयसोबत जॅकलीन फर्नांडीस, नुसरत भरुचा आणि चित्रपटाची टीम उपस्थित होती. मुहूर्त शॉट घेण्यापूर्वी अक्षय आणि त्याच्या टीमने राजसदनात जाऊन अयोध्या नरेश विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांची भेट घेतली.  तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली.

अक्षयने सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटलं आहे, ‘आज श्री अयोध्या मध्ये फिल्म रामसेतूचा शुभारंभ करण्यात आला आहे. भगवान श्री राम यांचे आशिर्वाद लाभले. जय श्री राम’.

राजपरिवार प्रवक्ते आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टी विमलेंद्र मोहन प्रताप मिश्र यांनी अक्षय आणि त्याच्या टीमचे आतिथ्य केले. या चित्रपटाचे शुटींग अयोध्येच्या अनेक भागात होणार आहे. त्यात राजसदन, शरयू काठ, राम की पौडी आणि रामजन्मभूमी परिसराचा समावेश आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा असणार आहेत. अक्षय कुमार रामसेतू चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अक्षय कुमारसह  जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूच्चा मुख्य भूमिकेत असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!