Share

विद्यापीठात यंदाच्या वर्षासाठी ३३७ कोटींचा अर्थसंकल्प सादर

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या ‘कौशल्य विकास‘ साठी ३ कोटी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ३३७ कोटींचा विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा बैठक शुक्रवारी झाली. २०२१ – २२ या आर्थिक वर्षात ३३७. १२ कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत सादर करण्यात आला. शनिवारी होणाऱ्या बैठकीत या बाबत चर्चा करण्यात येवून मंजूरी मिळणार आहे.

विद्यापीठाच्या नाटयगृहात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची मंचावर उपस्थिती होती. व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी अर्थसंकल्प सादर केला. विद्यापीठाचा विकास निधी म्हणून ९४ कोटी ५९ लाख ४३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. स्वतंत्र प्रकल्प योजनांसाठी १३ कोटी ८२ लाख रुपये मंजूर आहेत. ज्ञानस्त्रोत केंद्र अर्थात मध्यवर्ती ग्रंथालयासाठी १ कोटी १३ लाख, अध्यासन व संशोधन केंद्रासाठी १ कोटी ७० लाख, लोकनेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन केंद्रासाठी २० लाखांची तरतूद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयासाठी २ कोटी तर नामांतर शहीद स्मारकासाठी एक कोटींची तरतूद केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियलसाठी २ कोटी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल लायब्ररीसाठी १. ५ कोटी, विद्यार्थी विकास मंडळासाठी ९ लाख, परीक्षा शुल्क – ६८. २५ कोटी २०. २५, शिक्षण शुल्क विनिर्दिष्ट अनुदाने ९१. ५१ कोटी २७. १४ , शिक्षण शुल्क १२. १७ कोटी ३. ६१, स्वयंनिर्वाह अभ्यासक्रम १२. ३४ कोटी इतर शुल्क २२. १७ कोटी विद्यापीठ प्रकाशने मुद्रणालय, ग्रंथालय व घसारा निधी १०. ९८ कोटी ३. २६ अशी ठळक वैशिष्टये या अर्थसंकल्पात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!