Share

दोन दिवसाच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झाले ‘हे’ ९ विधेयके

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन संपुष्टात आलं. या दोन दिवसीय अधिवेशनात जवळपास 9 विधेयके मंजूर करण्यात आलीत. दोन्ही सभागृहात 9 विधेयके मांडण्यात आली असता ती मंजूरही झाली. एकूण 11 विधेयक विधिमंडळात सादर करण्यात आली होती. त्यातील एक विधेयक विधानसभेत प्रलंबित असून, 1 विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं. त्यामुळे दोन्ही सभागृहांची 9 विधेयकांना मंजुरी मिळाली.

दोन्ही सभागृहात संमत विधेयके – 9

विधान सभेत प्रलंबित विधेयके – 1

विधान परिषदेत प्रलंबित विधेयके – 0

संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके – 1

एकूण विधेयके – 11

दोन्ही सभागृहात संमत विधेयके

१) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. 54- महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2020 (पुन:स्थापनार्थ, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(२) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. 48 – मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2020, (मुद्रांक शुल्कात केलेल्या कपाती प्रमाणे अधिभारामध्ये कपात करण्याची तरतूद करणे) (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 16) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(३) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. 44 – महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, २०२०, (कोविडमुळे, सहकारी संस्थांमधील महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी संचालक मंडळांना अधिकार देणेबाबतची तरतुद) (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 17 ) (पुर:स्थापित दि. 14.12.2020 विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(४) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र.45 – महाराष्ट्र सहकारी संस्था (पाचवी सुधारणा) विधेयक, २०२०, (कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ मार्च २०२१ पर्यत घेण्यास, लेखापरिक्षण अहवाल ३१ डिसेंबर २०२० पर्यत सादर करण्यासाठी वाढ करणे व गृह निर्माण संस्थेच्या विद्यामान समितीचे संचालक हे नविन संचालक मंडळ गठीत होईपर्यत कामकाज पाहतील अशी तरतुद करणे) (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 18 ) (पुर:स्थापित दि. 14.12.2020 विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(५) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 46- महाराष्ट्र महानगरपालिका, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, 2020, (कोविडच्या पार्श्वभूमीवर नजिकच्या काळामध्ये निवडणुका न झालेल्या 12 नागरी स्थानिक संस्थामधील प्रशासकांच्या नियुक्तीच्या कालावधी 6 महिन्यापर्यत वाढविणे) (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 19) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(६) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 47- मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2020 (कोविड-19 संसर्ग सार्वत्रिक साथ रोगामुळे सन 2020-21 मध्ये मालमत्ता करातुन सुट तसेच सवलत देण्याकरिता कलम 154 मध्ये पोट-कलम (1ड) नव्याने दाखल करण्याबाबत.) (नगर विकास विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 20) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(७) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 50- महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२० (कोरोना विषाणुच्या प्रार्दुभावामुळे नवीन महाविद्यालय, नवीन पाठयक्रम, विषय विद्याशाखा अतिरिक्त तुकडी इत्यादी सुरू करण्याची परवानगी कार्यपध्दतीचे सन २०२०-२१ यावर्षी करिता नवीन वेळापत्रक विनिर्दिष्ट करणे.) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन २०२० चा महा. अध्या. क्र. 21) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(८) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 49 – डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापुर विधेयक, 2020 (स्वयं अर्थ सहाय्य विद्यापीठ स्थापन करणे) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

(९) सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. 53 – महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ विधेयक, 2020 (आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करणे) (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) (पुर:स्थापित दि. 14.12.2020, विधानसभेत विधानसभेत संमत दि. 15.12.2020, विधान परिषदेत संमत दि. 15.12.2020).

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!