मुंबई : कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आजचा २० वा दिवस आहे.आंदोलनावर तोडगा कधी निघणार याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने दिलेला लेखी प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी फेटाळला होता. सरकारने कृषी कायदेच मागे घ्यावेत, अशी ठाम भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे.
दरम्यान, यासंदर्भात भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाष्य करत केंद्र सरकारची भूमिका व त्यावर शेतकरी नेत्यांनी दिलेला प्रतिसाद यावर भाष्य केलं आहे. “दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची आमची तयारी आहे. मात्र, या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे,” अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.
तसंच, या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही उपाध्ये यांनी केला. “केंद्र सरकार पंजाबमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी अनेक दिवसांपासून चर्चा करीत आहे. अचानक या संघटनांनी दिल्लीत येऊन आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. दिल्लीत आल्यावरही या संघटनांच्या नेत्यांकडे सरकारने चर्चेसाठी प्रस्ताव पाठवले. चर्चेद्वारे शंका दूर व्हाव्यात, तसेच कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचीही तयारी सरकारने दर्शविली आहे. तसे प्रस्तावही या संघटनांच्या नेत्यांकडे पाठवले आहेत. मात्र आंदोलनकर्त्या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत,” असं उपाध्ये म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- पदवीधरच्या लोकांनी पराभव केला ते भाजपला खूप झोंबलंय; अजितदादांची तुफान टोलेबाजी
- फडणवीस दिल्लीत जावेत अशी सर्वांसह मुनगंटीवारांचीही इच्छा; ठाकरेंची फटकेबाजी
- ‘मराठा तरुणांना आरक्षण मिळवून देण्यासाठी टोकाचा संघर्ष करू’
- ‘रेकॉर्ड वर घ्या, मराठा समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाचं एक कणही काही काढून घेणार नाही’
- मराठा आरक्षणाबाबत भाजपने राजकारण बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करावं – अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

