चेन्नई : सिनेसृष्टी आणि राजकारण हे एक जणू काही समीकरण आहे. त्यामुळे बॉलीवूडची अनेक मंडळी सक्रिय राजकारणात तसेच अनेक राजकीय पक्षांच्या भूमिकांचं वेळोवेळी समर्थन करताना दिसून येतात. सध्या कोरोना नंतर च्या काळात देशासमोर अनेक समस्यां अनेक आव्हाने उभी आहेत यामध्येच पुढील वर्षी तामिळनाडू विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सुपरस्टार रजनीकांत सक्रिय राजकारणात प्रवेश करणार आहेत. तर पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे अभिनेता कमल हासनने म्हटले आहे. यासाठी सुपरस्टार रजनीकांत यांचे सहकार्यही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
याआधी देखील मक्कल सुधी माइम (एमएनएम) पक्षाच्या वतीने कमल हासन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, पुढच्या वर्षी मी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. कमल हासन म्हणाले की, रजनीकांत यांच्याशी ते राजकारणाविषयी चर्चा करीत आहेत. त्यांनी राजकीय भूमिकेबाबत निर्णय घ्यायला हवा, असेही ते म्हणाले होते. मक्कल सुधी माइम (एमएनएम) पक्षाचे राजकारण आरोप करण्यासाठी किंवा सूडबुद्धीचे असणार नाही. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही कमल हासन यांनी सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केल्यानंतर, आता त्यांच्या सोबत जाण्याचे विविध पक्षांकडून प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम या पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
कमल हासन यांनी रजीकांत यांच्याशी हात मिळवणी करण्यासंदर्भातील प्रश्नास उत्तर देताना सांगितले की, आमच्या केवळ एका फोनचा उशीर आहे. जर आमचे विचार सारखे आहे आणि यामुळे लोकांना फायदा होत असेल, तर आम्ही आमचा ‘इगो’ सोडून एकमेकांची मदत करण्यास तयार आहोत. कमल हासन यांनी मंगळवारी दिवंगत नेते एम जी रामचंद्रन (एमजीआर)यांच्या ऐतिहासिक कार्यांना उजाळा दिला आणि म्हटले की माजी मुख्यमंत्र्यांचे नाते संपूर्ण तामिळनाडूशी होते.
यावेळी, अन्नाद्रमुक पार्टीचे नाव न घेता कमल हासन म्हणाले की, जेव्हापासून मी आपल्या भाषणांमध्ये एमजीआर यांच्या नावाचा उल्लेख करू लागलो आहे, तेव्हापासून एक पक्ष नाराज झाला आहे व त्यांचा दावा आहे की एमजीआर केवळ त्यांचेच आहेत. मात्र एमजीआर तर संपूर्ण तामिळनाडूचे आहेत, केवळ एका पक्षाचे नाहीत.
हेच कारण आहे लोक त्यांना ‘मक्कल तिलगम'(जन नेता) म्हणत होते. भलेही ते कोणत्याही पार्टीशी जुडलेले असतील. अगोदर ते द्रमुकमध्ये होते व नंतर त्यांनी अन्नद्रमुकची स्थापना केली. राज्यातील संपूर्ण जनता एमजीआर यांना आपलं मानते आणि जर असं असेल व सत्तारुढ पक्ष त्यांना केवळ एकाच पक्षाचे नेते म्हणत असेल, तर अशा भूमिकेविरोधात जनता निर्णय देईल.
दरम्यान, रजनीकांत यांनी या अगोदर ट्वीट करत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी महिन्यापासून कार्यरत होईल असेही यावेळी सांगितलं आहे.
याशिवाय रजनीकांतशी निगडीत असलेली संघटना रजनी मक्कल मंद्रम(आरएमएम)ने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की, ते रजनीकांत सुरू करत असलेल्या पक्षाच्या नावाची व निवडणूक आयोगाकडून त्यांना दिल्या जाणाऱ्या चिन्हाबाबतच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकरी संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत’
- …तर मुख्यमंत्र्यांसह इतर एकाही मंत्र्यांला राज्यात फिरू देऊ नका : नितेश राणे
- ‘मराठा तरुणांना आरक्षण मिळवून देण्यासाठी टोकाचा संघर्ष करू’
- ‘रेकॉर्ड वर घ्या, मराठा समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाचं एक कणही काही काढून घेणार नाही’
- मराठा आरक्षणाबाबत भाजपने राजकारण बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करावं – अशोक चव्हाण


