मुंबई : राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. कालपासून सुरु झालेल्या या अधिवेशनात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. विरोधकांचा हा बाणा आजही कायम असल्याचं दिसून आला. विरोधकांच्या प्रश्नांना-टीकांना उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
चांद्या’पासून ‘बांद्या’पर्यंत महाराष्ट्र एकच आहे, त्यामुळे निधीवाटपात कोणत्याही प्रदेशावर अन्याय होण्याचा प्रश्न येत नाही. राज्यातील जनतेला समान न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. राज्यातील ‘कोराना’ संकटाचा सामना करण्यात राज्यसरकार कमी पडलेले नाही. सरकारच्या सर्व यंत्रणा व जनता सर्वशक्तीनिशी कोरोनाशी एकजुटीनं लढत आहे. हा लढा पुढेही सुरु राहील, असं अजित पवार म्हणाले.
‘कोरोना लढ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. कोरोना संकटाबरोबरच राज्यावर चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूरस्थिती अशी अनेक नैसर्गिक संकटे आली. या संकटातील बाधितांसाठी केंद्राच्या निकषापेक्षा अधिकची मदत राज्य सरकारने केलेली आहे. मदत करताना सर्वांना समान मदत केली आहे. कोणत्याही प्रकारचा प्रादेशिक अन्याय होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे.’ असं देखील त्यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या
- ‘शेतकरी संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत’
- …तर मुख्यमंत्र्यांसह इतर एकाही मंत्र्यांला राज्यात फिरू देऊ नका : नितेश राणे
- ‘मराठा तरुणांना आरक्षण मिळवून देण्यासाठी टोकाचा संघर्ष करू’
- ‘रेकॉर्ड वर घ्या, मराठा समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजाचं एक कणही काही काढून घेणार नाही’
- मराठा आरक्षणाबाबत भाजपने राजकारण बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करावं – अशोक चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

