नवी दिल्ली – काल पंतप्रधान मोदींनी करोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये आरोग्य मंत्रालय, नागरिक हवाई उड्डाण मंत्रालय, रस्ते आणि परिवहन मंत्रालयाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधानांनी करोना लसीकरणासंदर्भात सर्वच मंत्र्यांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं. कोरोनाच्या कालावधीमध्ये हाती घेतलेले प्रकल्प रखडणार नाही याची काळजी घेण्याचंही आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात लसीकरण केंद्रावर जाणून परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी आपल्या सहकऱ्यांना केल्यात.
पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये करोना परिस्थितीचा आढावा घेताना करोनासंदर्भातील नियमांचे कटाक्षाने पालन करावे असे सांगितले. तसेच मंत्र्यांनी स्वत: मास्क लावण्याबरोबरच लोकांनाही मास्क लावण्याचे महत्व पटवून द्यावे. करोना संपलाय असे कोणीही समजू नये. तिसरी लाट येणारच नाही अशापद्धतीने आपल्याला काम करावे लागणार आहे, असेही मोदी यावेळी मंत्र्यांशी बोलताना म्हणाले.
नुकतीच संपूर्ण देशभरातील लसीकरण मोहिमेची जबाबदारी मोदी सरकारने आपल्या खांद्यावर घेतली असून या मोहिमेत अनेक अडथळे येत आहेत. सामान्य नागरिक अनेक समस्यांचा सामना करत असून अधिकाऱ्यांच्या ऐवजी जर स्वतः मंत्र्यांनी लोकांशी संवाद साधला तर नेमक्या समस्या काय आहेत हे समजू शकते. या समस्या जाणून घेतल्यानंतर पुढे त्यावर उपाय करणे देखील सोपे जाऊ शकते म्हणूनच मोदी लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्षात लसीकरण केंद्रावर जाणून परिस्थितीचा आढावा घेण्यास आपल्या सहकाऱ्यांना सांगत आहेत.
याशिवाय मंत्र्यांनी स्वत: मास्क लावण्याबरोबरच लोकांनाही मास्क लावण्याचं महत्व पटवून द्यावं असं मोदींना अपेक्षित आहे. कोरोना संपलाय असं कोणीही समजू नये. तिसरी लाट येणारच नाही अशापद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे हे लक्षात घेवूनच मोदींना मंत्र्यांनी लोकांशी संवाद साधावा अशी सूचना दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- भ्याड हल्ल्यानंतर रोहित पवारांचा फोटो ट्विट करून पडळकरांनी नेमके काय दिले आहेत संकेत ?
- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का ; ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर
- ‘पंढरीची वारी झाल्यावर देशातील नव्हे जगातील कोरोना नामशेष होईल’
- वारीनंतर कोरोना नामशेष होईल असा दावा करणाऱ्या भिडेंनी यापूर्वीही उधळली आहेत मुक्ताफळे
- नोरा फतेहीचा नवीन डान्स व्हिडीओ पाहून चाहते झाले घायाळ


