🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोना निर्बंध लागू असतांना ईदसाठी ग्राहकांना बंद दुकानाचे शटर उघडून पोकीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ऑनेस्टी कपड्याच्या दुकानाचा व्हीडीओ व्हायरल झाला होता. पोलिसांनी त्या व्हीडीओ वरून ऑनेस्टीसह लगतच्या सात ते आठ दुकानांवर दुकान उघडली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
शहरात वाढता प्रादुर्भाव पाहता मागील महिन्यापासून कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्याला आता अनेक व्यापारी प्रतिसाद देतांना दिसत नाही आहे. काही दिवसांवर रमजान ईद येथून ठेपली आहे. तिच्या खरेदी करता लोक म्प्ठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहे. यामुळे कपडे व्यापारी मोठ्या प्रमाणात शटरच्या आतून व्यवसाय करत असल्याची परिस्थिती शहरातील पैठण गेट, सिटी चौक, शाहगंज भागात दिसत आहे.
सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या ऑनेस्टीकपड्याच्या दुकानात दुकानदार २०-३० ग्राहक एक सोबत शिरवत त्यांना कपडे विक्री करत आहे. त्या दुकानात खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडालेली दिसत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला. विशेष म्हणजे पोलिसांनी तो व्हीडीओ पाहून ऑनेस्टी दुकानावर कारवाई केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कोरोनावर मोफत उपचार द्या’, शिवसेना नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
