अहमदनगर : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी कोरोना रुग्णांसाठी राज्यात सरकारी दवाखान्यासह खासगी रुग्णालयातही कोविड रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अनेक गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांचे प्राण यामुळे वाचणार आहे.
आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्र सरकारनेही आपल्या राज्यात कोरोना रुग्णांसाठी सरकारी दवाखान्यात सोबत खासगी दवाखान्यातही कोरोना रुग्णांसाठी मोफत देण्याची योजना राबवावी, अशी मागणी शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सध्या कोरोनाची दुसरी लाट चालू आहे. तिसरी लाट ही महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर उभी आहे. अशा परिस्थितीमुळे कोरोना संसर्ग वाढला आहे. आर्थिक अडचणीमुळे पैशाअभावी अनेकांचा मृत्यू यामध्ये झाला. काही रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही. बेड उपलब्ध झाले तर रेडमीसेवर इंजेक्शन मिळत नाही. या इंजेक्शनचा काळा बाजारही वाढला. अशा सगळ्या दुष्टचक्रात जनता सापडली.
वर्षभरापासून सामान्य जनतेला रोजगार नाही, व्यवसाय बंद, उद्योग धंदे बंद हाताला काम नाही. त्यामुळे एखाद्या कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, तर अशा कुटुंबाची मोठी धावपळ होते. नातेवाईकांकडून पैसे उपलब्ध करून सोने गहाण ठेवून कोरोना रुग्णांना वाचवण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र खासगी दवाखान्यांमध्ये या रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांसाठी मोफत उपचार करावेत, अशी मागणी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘पीक कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करणार’, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
- महत्त्वाचे! ‘इएसआय’ सदस्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेऊन खर्च परत मिळणार
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
- यांच काही वेगळच चाललंय, निवृत्ती स्विकारण्याच्या वयात कसोटी पदार्पण; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम


