मुंबई : नऊ सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली; त्यामुळे ज्यांची नोकरी व शैक्षणिक प्रवेश अडचणीत सापडले, त्या युवकांमध्ये प्रचंड नैराश्य आले. तसेच हजारो मराठा विद्यार्थी-उमेदवार जीवन संपवण्याच्या काठावर उभे आहेत. म्हणूनच या स्थगितीचा अन्वयार्थ लावणे आणि विविध पर्याय देणे क्रमप्राप्त आहे. यासाठी आता मराठा समाज कमालीचा आक्रमक झाला आहे.
मुंबईत मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च काढण्यात आला आहे. काही वेळेपूर्वीच या मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मशाल मोर्चा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीवर धडकणार आहे. मुंबईमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून हा मोर्चा अडवल्यास त्याचठिकाणी ठिय्या मांडण्याचा इशारा शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्ते असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आजच्या या मोर्चावर सडकून टीका केली आहे. हा अशाप्रकाश मोर्चा काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दबाव आणला जात असून ते चुकीचं आहे. सद्याच्या परिस्थितीमध्ये असा मोर्चा काढणे म्हणजे कायद्याचा भंग असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस महासंचालकांनी अशा मोर्चांना बंदी घालावी, अशी म्हणी सदावर्ते यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा फार मोठा विनोद – सामंत
- शिवसेनेच्या काळात एसटी महामंडळाची वाट लागली, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा घणाघात
- टीकेची झोड उठल्यानंतर अखेर गोव्यातील सनबर्न फेस्टिवल रद्द !
- ‘… तर मराठा आरक्षणासाठी आता अख्खं मंत्रालय जाळून टाकू’
- मुक्काम वाढला!, अर्णबची आजही सुटका नाहीच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

