सिंधुदुर्ग : शिवसेना आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्यातील वैर महाराष्ट्रात सर्वांना ठाऊक आहे. राजकारणाची सुरुवात शिवसेनेसोबत केल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सत्तेतील मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली होती. यानंतर काही राजकीय वादामुळे त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेस सरकारच्या काळात देखील त्यांनी विविध मंत्रिपद सांभाळले. यानंतर शिवसेनेशी छत्तीसचा आकडा निर्माण झाल्यामुळे अनेकदा शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष पाहायला मिळाला. नारायण राणे यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढल्यानंतर २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला. सद्या ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार असून त्यांचे चिरंजीव नितेश राणे हे आमदार आहेत.
कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवण्यात येईल. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता 56 आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेची संख्या कमी होईल, असा प्रहार नारायण राणेंनी केला होता. यावर शिवसेनेनं देखील प्रत्युत्तर देऊन राणेंवर प्रतिहल्ला चढवला आहे.
“कोकणात यानंतर शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा फार मोठा विनोद आहे. मी सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्यांनाही हलक्यात घेत नाही ,राणेंना तर घेणारच नाही”, असं प्रत्यत्तर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चमकोगिरी’ करण्यापेक्षा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्या; सुजित झावरेंचा निलेश लंकेंवर निशाणा!
- शिवसेनेच्या काळात एसटी महामंडळाची वाट लागली, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा घणाघात
- टीकेची झोड उठल्यानंतर अखेर गोव्यातील सनबर्न फेस्टिवल रद्द !
- ‘… तर मराठा आरक्षणासाठी आता अख्खं मंत्रालय जाळून टाकू’
- मुक्काम वाढला!, अर्णबची आजही सुटका नाहीच


