नाशिक : दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक महिन्यांचे वेतन रखडल्यानं एसटी कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत. थकीत वेतन तात्काळ दिले नाहीत तर एसटी कर्मचारी संपाचं अस्त्र उपसणार असल्याचा इशारा इंटकचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. शिवसेनेच्या शिवसेनेच्या काळात खासगी कंत्राटदार आणल्याने एसटी महामंडळाची वाट लागली, असा आरोप जयप्रकाश छाजेड यांनी करत सरकारला घरचा आहेर दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळी आधी दिले नाहीत तर आम्ही महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा देखील जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जयप्रकाश छाजेड म्हणाले की, कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनच मिळाले नाही. कोरोना काळात काम करुनही एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही.
ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे संसाराचा गाडा रेटायचा तरी कसा? हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यात दिवाळी सण तोंडावर आला आहे, सण साजरा करायचा तरी कसा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. दरम्यान, एसटी कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही विनवणी केली होती. परंतु, अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. त्यामुळे आता कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार द्या, 1936 च्या कायद्यान्वये महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करु, अशी भूमिका इंटकने घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आक्रोश मोर्चा : मराठा आंदोलकांना रोखलं; मोजक्या आंदोलकांना बसने मुंबईला पाठवणार!
- ‘मी निवृत्त झाले’ म्हणून धक्का देणारी पी. व्ही. सिंधू एशियन स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज !
- कलम ३७० पुन्हा लागू होईपर्यंत मरणार नाही : फारूख अब्दुल्ला
- ‘फारूख अब्दुल्लांनी पाकिस्तानात जाऊन कलम ३७० लागू करावे’
- तब्बल सात वर्षानंतर सोबत येणार अमिताभ बच्चन आणि अजय देवगण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

