Share

मुक्काम वाढला!, अर्णबची आजही सुटका नाहीच

Published On: 

अलिबाग : अन्वय नाईक प्रकरणी बुधवारी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली. रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख, नितेश सरडा या तिन्ही संशयित आरोपींची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या तिघांना नगरपालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले आहे.

अर्णब गोस्वामींचा अलिबाग शाळेतील मुक्काम वाढला आहे. अर्नबच्या जामीनावर आज मुंबई उच्च नायालयात सुनावणी झाली. मात्र, कोणताही निकाल समोर आला नसून याबाबत पुढील सुनावणी उद्या होणार आहे. त्यामुळेच अर्णबला आजची रात्र देखील नगरपालिकेच्या शाळेतच घालवावी लागणार आहे.

अर्णबला एक धक्का, तर एक दिलासा!

अर्णबच्या जामीनावर आजही शिक्कामोर्तब झाला नसला तरी त्याला एक दिलासा देखील मिळाला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. ही मागणी मान्य करून अलिबागच्या मुख्य़ न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, या सुनावणीनंतर अलिबाग पोलिसांनी सत्र न्यायलयात त्याच्या पोलीस कोठडीसाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली असता, अर्णवच्या पोलीस कोठडीच्या निर्णयाबाबत 9 नोव्हेंबरला सुनावणी घेतली जाईल असे सत्र न्यायालयामार्फत सांगण्यात आल्याने अर्णबला तूर्तास तरी पोलीस कोठडीपासून दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!