Share

टीकेची झोड उठल्यानंतर अखेर गोव्यातील सनबर्न फेस्टिवल रद्द !

Published On: 

पणजी – गोवा पर्यटनासाठी जग प्रसिद्ध आहे. या ठिकाणी २७ डिसेंबरपासून सनबर्न फेस्टिवल होणार होते. मात्र, विरोधी पक्ष आणि गोव्यातील नागरिकांनी कोरोनाचा धोका पाहता याला विरोध केला आहे. कोरोना मुळे करण्यात आलेले लॉक डाऊन हळूहळू अनलॉक होत असून अनलॉक-५ नंतर पुन्हा जनजीवन पूर्वपदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात आयोजकांच्यावतीने सनबर्नच्या देशातील १४ व्या महोत्सवाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. तीन दिवसांचा महोत्सव वाघातोरमध्ये २७ डिसेंबरपासून होणार होता.

गोवा सरकारने सनबर्न (इलेक्ट्रॉनिक डान्स म्युजिक) फेस्टिवलच्या आयोजकांना दिलेली परवानगी अखेर मागे घेतली आहे. उत्तर गोव्यातील वागोटोर येथे २७ डिसेंबर महिन्यापासून तीन दिवसीय सनबर्न फेस्टिवलचे आयोजन होणार होते. गोव्यातील भाजपा सरकारने कोरोना महामारीच्या संकटातही सनबर्नला परवानगी दिल्याने चोहोबाजूने त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. शुक्रवारी गोवा काँग्रेसने सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. गोव्यातील नागरिकांनी देखील सोशल मीडियावर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.

गोव्यातील कोरोना आणखी टळलेला नाही. मात्र, आयोजकांनी सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे आम्ही त्यांना परवानगी दिली होती. मात्र, कोरोनाचा धोका आणि नागरिकांचा विरोध पाहता गोवा सरकारने सनबर्न फेस्टिवलला दिलेली परवानगी मागे घेतली आहे. काल सायंकाळी गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी परवानगी मागे घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर फेस्टिवलच्या ट्विटर हँडल वरून देखील या बद्दल माहिती देण्यात आली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!