औरंगाबाद : शहरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून उघडे ड्रेनेज चेंबर मध्ये १८ वर्षीय तरुण पडला. मात्र जागरुक नागरिकांनी अवघ्या तीस सेकंदात दुसऱ्या ड्रेनेजमधून त्याला बाहेर काढले. त्यामुळे या तरुणाचे प्राण वाचले. जय भवानी नगर रात्री आठ वाजता ही घटना घडली. त्यामुळे या तरुणाबाबत काळ आला होता पण वेळ आली नव्हती. असेच म्हटले जात आहे. मात्र मनपा प्रशासनाचे
रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर जय भवानी चौकात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. मुख्य रस्त्यावरील उघडे ड्रेनेज चेंबर पाण्यात बुडाले. याच भागात राहणारा तरुण मोरेश प्रकाश सूळ हा पायी जात असताना अचानक या ड्रेनेज चेंबर मध्ये पडला. हे दृश्य परिसरातील नागरिकांनी बघितले. त्यांनी आरडाओरड करून त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.
वीस फूट अंतरावरील दुसऱ्या चेंबरमधून त्याला बाहेर काढण्यात आले. नशीब बलवत्तर असल्याने मोरे बालंबाल बचावले. अवघ्या तीस सेकंदाचा घटनेने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. जय भवानी नगर चौक ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात ड्रेनेजच्या मॅनहॉल मध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर राजकीय मंडळींनी प्रचंड टिकेची झोड उठवली होती. मात्र याचा काहीही फायदा झालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अस्वस्थता नाही, पण आम्हाला फसवलं गेलं याचं दुःख आहे’, खडसेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचे उत्तर
- महाविकास आघाडी सरकार हे आरक्षण विरोधी सरकार; रिपाइं चा गंभीर आरोप
- संजय दत्तने घेतली नितिन गडकरी यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा
- भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न : सचिन सावंत
- संभाजीराजेंच्या डोक्यात राजकारण नाही, ते समजदारवृत्तीने आंदोलन करतील – थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

