Share

महाविकास आघाडी सरकार हे आरक्षण विरोधी सरकार; रिपाइं चा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना काही दिवसांपूर्वी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला होता. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना 33 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामुळे विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं. तर, काँग्रेसने देखील नाराजी व्यक्त केली होती.

पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून रिपाइं देखील आक्रमक झाली आहे. पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे दि. 1 जून ते 7 जून आंदोलन सप्ताह राज्यभर पाळण्यात आला. आज आंदोलन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी राज्यभर रिपब्लिकन पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले.आंदोलन सप्ताहाचा समारोप मुंबईत बोरिवली तहसील कार्यलयावर रिपाइं मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, आयोजक जिल्हा अध्यक्ष हरीहर यादव यांच्या नेतृत्वात आंदोलन करून करण्यात आला.

यावेळी गौतम सोनावणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार च्या काळात मराठा आरक्षण घालविले. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालविण्यात आले. यासोबतच, दलित आदिवासी मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील हक्काचे आरक्षण रोखण्यात आले आहे. त्यामुळे हे सरकार आरक्षण विरोधी सरकार आहे. या सरकार मध्ये आरक्षण विरोधाचा अजेंडा शिवसेनेचा की राष्ट्रवादी चा ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट करावे, असं आव्हान देखील सोनावणे यांनी दिलं आहे.

रामदास आठवले घेणार शरद पवारांची भेट !

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले लवकरच शरद पवार यांची भेट घेणार आहेत. पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून आठवले हे पवारांची भेट घेणार आहेत. पदोन्नतीमधील अरक्षणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने त्वरित घ्यावा अन्यथा रिपब्लिकन पक्ष राज्यात अधिक तीव्र आंदोलन छेडेल. त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती राज्य सरकार ची जाबाबदारी असेल, असा इशारा देखील रामदास आठवले यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!